तुषार पाचलकर
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाचा वार्षिक क्रीडा महोत्सव 2024- 2025 चा उद्घाटन सोहळा माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रशांत झोरे इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण इंग्रजी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे,पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्या शुभहस्ते क्रीडा ध्वजाचे आरोहण करण्यात आले. तसेच प्रशांत मोरे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढले त्यानंतर राज्य विभाग जिल्हास्तरावर विजय संपादन केलेले विद्यार्थी स्नेहा भोसले, महिमा महाडिक शुभ्रा पवार व इतर खेळाडू या विद्यार्थ्यांनी आणलेली क्रीडा ज्योत मान्यवरांच्या शुभहस्ते प्रज्वलित करण्यात आली. प्रसंगी संगीत विभागाच्या अर्चना पाटील व संतोष खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत सादर केले यावेळी प्रमुख अतिथी संतोष चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात येतं असं सांगताना सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे संबोधित करत सर्वांना क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, त्यानंतर चारही हाऊसचे कुलप्रमुख कॅप्टन्स व विद्यार्थी यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन झाले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसह पालकांच्या कलागुणांना वाव देखील वाव मिळावा म्हणून पालकांसाठी देखील काही स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धांमध्ये गोळाफेक, बुद्धिबळ, लांबउडी, लंगडी, रस्सीखेच, डोजबॉल, अश्या खेळांचा समावेश होता. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हा मोहोत्सव यशस्वी करण्यास सहकार्य केलं होतं.
संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन म्हणून प्रताप शिंदे, विलास यशवंतराव, ज्योती बडवी यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सारिका दिवेकर यांनी केले तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांच्या प्रति आभार व्यक्त केले.