रत्नागिरी : जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ९७,७०० रूफटॉप बसविण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत अवघे ३६० ‘रूफ टॉप’ सोलार पॅनल बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातून रूफ टॉपसाठी ७०६ घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले आहेत.
घराच्या छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. अधिकची निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सौर प्रकल्पासाठी २ किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रती किलोवॅटला ३० हजार रुपये तर तिसऱ्या किलोवॅटला १८
घराच्या छतावर सौर प्रकल्प बसवून वीज निर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीज निर्मिती झाल्यास वीज बिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते अधिकचे निर्माण झालेली वीज महावितरण ला विकून उत्पन्नही मिळते प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सर्व प्रकल्पासाठी दोन किलो वॅट क्षमतेपर्यंत प्रति किलो वॅटला तीस हजार रुपये तर तिसर्या किलोवॅटला 18 हजार रुपये अनुदान मिळेल. अर्थात १ किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळते.
एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाद्वारे वार्षिक सरासरीने मासिक सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते. मासिक १५० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबाला २ किलोवॅट, तर मासिक १५० ते ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी ३ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा पुरेशी ठरणार आहे.