खेड : खेड तालुका विज्ञान मंडळाच्या वतीने 52 वे विज्ञान प्रदर्शन शिवशंकर माध्यमिक विद्यालय कुळवंडी येथे संपन्न झाले.या विज्ञान प्रदर्शनामध्ये खेड तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक व वाडी बीड शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण अण्णा चोरगे यांनी बनवलेले गणिती खजाना या विविध घटकांवर आधारित गणित मॉडेलचा शिक्षक प्रतिकृतीमध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे.सदर प्रतिकृती जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडली गेली आहे.श्री लक्ष्मण चोरगे हे खेड तालुक्यातील एक उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत.खेड तालुक्यातील अनेक शाळा त्यांनी आपल्या हस्त कौशल्याने रंगसंगती आणून सजवलेल्या आहेत.दरवर्षी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन ते शिक्षक प्रतिकृतीमध्ये निश्चितच प्रथम क्रमांक मिळवतात.याही वर्षी त्यांचा प्राथमिक गटात शिक्षक प्रतिकृती मध्ये गणिती खजाना या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांना गणित हा विषय सहज व सोप्या पद्धतीने कसा शिकवावा.तसेच स्पर्धा परीक्षेला उपयोगात येणारी सूत्रे या प्रतिकृती द्वारे कशी सहज सोडवता येतील.याबाबत मांडणी केली होती अनेक मान्यवर मंडळींनी या प्रतिकृतीचे कौतुक केले.श्री चोरगे सर यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल खेड तालुका गटशिक्षण अधिकारी श्री विजय बाईत व विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुनिता बेलोसे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.व जिल्हास्तरासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या श्री चोरगे सर यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री.विजय बाईत,शिक्षण विस्तार अधिकारीश्री.श्रीधर शिगवण, केंद्रप्रमुख श्री.अंकुश उंडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ शाळा वाडी बीड,खेड तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी मित्रपरिवार यांनी श्री चोरगे सर यांचे अभिनंदन केले व जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.