लांजा : तालुक्यातील कोट येथो शिवसेना शाखेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार श्री. किरण उर्फ भैयासाहेब सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
दत्तजयंतीच्या निमित्ताने कोट दिवाळेवाडी येथील दत्तमंदिरात 13 रोजी आमदार किरण सामंत दर्शनासाठी आले होते. ते आमदार पदी नियुक्ती झाल्यावर प्रथमच कोट गावी आले होते. त्या निमित्ताने कोट शिवसेना शाखेच्यावतीने आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर यथोचित सत्कार शिवसेना शाखाप्रमुख सचिन नेवरेकर व ग्रा.पं.सदस्य राजु सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख राजुदादा कुरुप तसेच कोट शाखेचे सचिव रमेश नेवरेकर, स्वरुप नेवरेकर ,रुपेश नेवरेकर , दिनेश पाष्टे व शिवसैनिक उपस्थित होते.