पाली : पाली केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच कापडगाव शाळा क्र. एक येथे संपन्न झाल्या त्या स्पर्धामध्ये पाली शाळा क्र. एक ने वैयक्तिक व सांघिक प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये लहान गट कबड्डी मुलगे व मुली यांचे संघ विजेता झाले तर खो-खो स्पर्धेमध्ये मुलींचा संघ उपविजेता झाला तर वैयक्तिक मोठा गट थाळीफेक मध्ये प्रथम क्र. प्रणिता कांबळे, द्वितीय क्र. अनघा कांबळे, मोठा गट धावणे मुलांमध्ये द्वितीय क्र. गौरव पांचाळ तसेच लहान गट थाळीफेक मुलींमध्ये प्रथम क्र. अवंतीका हट्टहोळी द्वितीय क्र. रचना कांबळे तर गोळा फेक मुलांमध्ये प्रथम क्र. साईश चव्हाण द्वितीय क्र. हर्ष धाडवे. धावणे मुलींमध्ये प्रथम क्र. आरोही सावंत मुलांमध्ये द्वितीय क्र. सौरभ मिस्त्री, थाळीफेक मुलांमध्ये प्रथम क्र. हर्ष धाडवे यांनी संपादन केला आहे.
अशाप्रकारे पाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात यश संपादन केले आहे.पाली केंद्रप्रमुख विष्णू पवार यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा कापडगाव शाळा क्र. एक येथे संपन्न झाल्या यावेळी कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र गराटे, वळके सरपंच उत्तम सावंत, पालीचे माजी सरपंच संदीप गराटे, कापडगाव सरपंच विघ्नेश कोत्रे, शिवसेना पाली जि.प. गट विभाग प्रमुख सचिन सावंत, पाली शाळा क्र. एकचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश शिंदे उपस्थित होते. या सर्व विद्यार्थी खेळाडूंना पाली शाळा क्र. एकचे मुख्याध्यापक डॉ. जनार्दन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, मारुती घोरपडे, श्रुती वारंग यांनी सराव करून घेतला. त्यामुळेच एवढे यश विद्यार्थ्यांना प्राप्त करता आले.