आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
तुषार पाचलकर / राजापूर
तालुक्यातील श्रीगणेश आडीवरेकर मित्रमंडळ राजापूरच्यावतीने किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने 4 जानेवारी रोजी राजापुरात भव्य बैलगाडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अशा तीन गटात घेतल्या जाणार आहेत.
राजापूर रोड रेल्वेस्टेशन नजीक असलेल्या जांभवलीच्या माळावर या स्पर्धा आयोजीत केल्या असून सकाळी 9 वा. उद्घाटन व सांयकाळी 5 वा. आ. सामंत यांच्याहस्ते बक्षिस वितरण होणार आहे. या स्पर्धेतील राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला पारितोषिक 51 हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक 25 हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक 15 हजार व मानाची ढाल. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक 31 हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक 15 हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक 10 हजार व मानाची ढाल. तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक 10 हजार व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक 5 हजार व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक 3 हजार व मानाची ढाल, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. शर्यतीचे आयोजक केळवली विभागप्रमुख नाना कोरगावकर व पाचल विभागप्रमुख शैलेश साळवी असून अधिक माहितीसाठी नाना कोरगावकर, प्रल्हाद नारकर (7588917878), प्रविण कानडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीगणेश आडीवरेकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.