रत्नागिरी : बाळ माने यांचे काम करणाऱ्याचा उदोउदो भाजपमध्ये होतो. यापुढे मी सगळ्या पदाचा राजीनामा दिला असून यापुढे काय करायच याचा विचार करणार असल्याचे भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा सोशल मिडिया संयोजिका वर्षा राजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी महिला जिल्हा अध्यक्ष सुजाता साळवी यांना अवघ्या 6 महिन्यात पदावरून हटवलं होते.
त्या म्हणाल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत चांगल काम केले. विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया 32 पोस्ट केल्या, नाव कुठे ही नाही. उलट दुसऱ्याच्या नावाने टाकल्या गेल्या . बॅनर वरुन वगळलं गेले. महायुतीचा धर्म पाळून आम्ही विधानसभा निवडणुकीत इथल्या महायुतीच्या उमेदवारांचे उदय सामंत यांचे काम केले. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत एक गट आमच्यावर नाराज झालेला आहे. अशी गटबाजी पक्षात असेल तर काम करताना अडचणी होतात. पक्ष वाढविणे गरजेचे असताना गटबाजी करून पक्षात फूट पाडण्याचे काम सुरू असल्याने आम्ही पदांचे राजीनामे पक्षश्रेष्टीकडे पाठवीत आहोत.
त्यांच्यावर प्रेम कायम राहणार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावरच प्रेम कायम राहील. मात्र रत्नागिरी दक्षिण विभागात गटबाजीचे राजकारण असल्याने आम्ही राजीनामे देत आहोत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे व आणखीही लोक याला जबाबदार आहेत.
–वर्षा राजे निंबाळकर
जिल्हा उपाध्यक्षा तथा सोशल मिडिया संयोजिका