रत्नागिरी : शहरातील मारुटिमंदिर येथील विवा हॉटेल समोर टँकरच्या टायरला आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. टँकर फुटून मोठा स्फोट होईल या भीतीने नागरिकांची पळापळ सुरू झाली. नगर परिषदेचा अग्निशमन बांब आणि रत्नागिरी एम आय डी सी येथील बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने रत्नागिरीत मोठा होणारा अपघात टळला आहे.
रत्नागिरीः
शहरातील मारुती मंदिरहून माळनाकाच्या दिशेने भारत पेट्रोलियमचां टँकर पेट्रोल रात्री 9 वाजता घेऊन चालला होता. यावेळी मारू मंदिर येथे टँकरच्या मागील टायरला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. तेवढ्यात नगर परिषदेला याची माहिती देण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी आधी अग्निशमन दल आणि त्यानंतर पोलीस दलाला याबाबतची माहिती कळवली. त्यानंतर एमआयडीसी आणि रत्नागिरी नगर परिषद यांचे दोन बंब घटना स्थळी दाखल झाले.
भारत पेट्रोलियमच्या या टँकरच्या टायरचे लायनर घासत असल्यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता प्राथमिक दृष्ट्या वर्तवण्यात आली आहे.