संगमेश्वर / प्रतिनिधी :- यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे नुकतेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी- चिंचघरी -सतीचे उपक्रमशील कलाशिक्षक तुकाराम पाटील यांना फेलोशिप सल्लागार समितीचे अध्यक्ष ,शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे ,एम.के.सी.एल चे अध्यक्ष डॉ.विवेक सावंत ,डॉ.सी .डी.माई, समन्वयक दत्ता सराफ ,दीप्ती नाखले ,योगेश कुदळे व शिक्षण, साहित्य आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत फेलोशिप प्रदान करण्यात आली .
बाहुलीनाट्यातून आनंददायी शिक्षण व भाषिक अभिव्यक्ती या उपक्रमांतर्गत त्यांनी विद्यालयांमध्ये वर्षभरामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले यामध्ये विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढविणे, बाहुल्या निर्मिती करणे व त्याचे सादरीकरण करणे ,पाठ्यपुस्तकातील विविध घटकांचे या माध्यमातून अध्ययन- अध्यापन करणे असे प्रयोग विद्यार्थ्यांना राबवण्यात आले .संवाद लेखन व बाहुली निर्मिती कार्यशाळा यामुळे विद्यार्थ्यांच्या कला- कौशल्यामध्ये आवड निर्माण झाली.
या उपक्रमांतर्गत संविधानाचा जागर, रस्ता सुरक्षा सप्ताह ,वन जीव सप्ताह, मराठी भाषा दिन इत्यादी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्यातून सादर करून उपक्रमाची यशस्वीता साध्य केली. सदर उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ .वसंत काळपांडे , डॉ.ह.ना.जगताप , डॉ.वर्षा कुलकर्णी, शिक्षण समन्वयक योगेश कुदळे ,प्राचार्य प्रकाश राजेशिर्के, डॉ.जामदार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम ,संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक ,सर्व संचालक मंडळ ,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापक .विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षक पांडुरंग पाटील ,पर्यवेक्षिका आसावरी राजेशिर्के, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
मार्गदर्शकामुळेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा ध्यास
‘ फेलोशिप अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध कार्यशाळा, उपक्रम यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध प्रयोग कसे राबवता येतील याचे सखोल ज्ञान मिळाले,आम्हाला लाभलेल्या तज्ञ मार्गदर्शकांमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नाविन्याचा ध्यास घेण्याची एक नवीन दृष्टी प्राप्त करून दिल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईला मनापासून धन्यवाद ‘– तुकाराम पाटील (कलाशिक्षक)
— तुकाराम पाटील (कलाशिक्षक)