रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेलले ” चिन्मय कॅरम क्लब” जुने पाॅवर हाऊस, नाचणे रोड येथील हे क्लब गेली १५ वर्षे क्लब मर्यादित ” लकी डबल कॅरम स्पर्धा” मोठ्या दिमाखात संपन्न होत आहेत. या वेळेस स्पर्धेचे १६ वर्ष आहे. यंदा ह्या स्पर्धा दिनांक २९ डिसेंबर २०२४ रविवार रोजी होणार आहेत.
स्पर्धेच्या चषकांचे अनावरण चिन्मय कॅरम क्लबचे जेष्ठ कॅरम पटू श्री.सुधीर मांडवकर साहेब, स्पर्धेचे प्रायोजक असलेले श्री. दिनेश शेठ शानबाग, श्री. स्वानंद शेठ नाखरेकर, श्री. विजय शेठ दामले, श्री. लहू शेठ घाणेकर ह्या मान्यवरांच्या हस्ते चषकांचे अनावरण करण्यात आले.
चिन्मय कॅरम क्लब मध्ये उद्योन्मुख, व्यावसायिक कॅरम पटू, राष्ट्रीय कॅरम पटू, आंतरराष्ट्रीय कॅरम पटू, ज्येष्ठ, हौशी व विविध शासकीय प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती तसेच रत्नागिरीतील व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती हे सदस्य आहेत.
चषक अनावरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिन्मय कॅरम क्लब चे अध्यक्ष श्री. अभिजित (दादा शेठ) नागवेकर, गणेश शेंडे, प्रविण पाटील, भाऊ गांगण, तुषार सनगर, दिपक करंडे ( कोल्हापूर), किरण घाणेकर, मंगेश कवितके, सतीश नाईक, धनंजय कदम यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मिलिंद शेठ वायंगणकर यांनी केले.