मेष : घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागतील
मेष : आज सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत वेळ व्यतित केल्याने भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. संपर्क क्षेत्रात वाढ होईल. घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागतील. तुम्ही तणावपूर्ण परिस्थिती अनुभवू शकता.
वृषभ : आज तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहाल
वृषभ : आज तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. विशेषत: महिलांना त्यांच्या कामात यश मिळेल. किरकोळ गोष्टींवर रागावल्याने घरातील वातावरण बिघडू शकते. अनावश्यक खर्च टाळा. अन्यथा आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. पोटविकाराकडे दुर्लक्ष करु नका.
मिथुन : आज व्यवसायात अपेक्षित यश मिळणार नाही
मिथुन : आज तुमचा चांगला विचार तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतो.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल. आज व्यवसायात अपेक्षित यश मिळणार नाही. आरोग्य चांगले राहील.
कर्क : ग्रहस्थिती सकारात्मक आहे
कर्क : ग्रहस्थिती सकारात्मक आहे. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आज धावपळ झाली तरी कामात यश मिळाल्याने थकवाही दूर होईल. वाहन किंवा कोणत्याही यांत्रिक उपकरणांचा वापर आज जपून करा. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुम्ही योग्यरित्या पार पाडू शकाल.
सिंह : धार्मिक कार्यात रुची वाढेल
सिंह : धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रलंबित काम पूर्ण कराल. आर्थिक बाबी अतिशय हुशारीने निर्णय घेण्याची गरज आहे. तुमची फसवणूक होऊ शकते. वातावरणातील बदल तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
कन्या : आज पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील
कन्या : आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगली स्थितीत राहील. आज वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. आज पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम होईल.
तूळ : आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा
तूळ : आज तुमच्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. कुटुंबातील ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मालमत्ता आणि वाहन संबंधित व्यवसायात सुधारणा होईल. आजपर्यंत पती-पत्नीचे नाते मधुर राहील.
वृश्चिक : आजचा काळ तुमच्या अनुकूल आहे
वृश्चिक : आजचा काळ तुमच्या अनुकूल आहे. ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील राहा. महत्त्वाच्या मुद्द्यांवर नातेवाईकांशी चर्चा होईल. शेजाऱ्यांशी काही प्रकारचा वाद होऊ शकतो. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता.
धनु : कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील
धनु : मालमत्तेसंबंधीचा वाद आज कोणाच्या तरी मध्यस्थीने शांततेने सोडवला जाईल. जवळच्या नातेवाईकाच्या भेटीमुळे दैनंदिन त्रासातून सुटका मिळेल. आळस आणि राग टाळा. व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित कोणत्याही कामात शांतपणे निर्णय घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
मकर : रखडलेली कामे आज प्रयत्नाने पूर्ण होतील
मकर : अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज प्रयत्नाने पूर्ण होतील. राजकीय आणि सामाजिक कार्यातही तुमचे वर्चस्व राहिल. मुलांच्या समस्या ऐका आणि त्यावर उपाय शोधण्यात वेळ घालवा. कोर्टात काहीu प्रलंबित केस असल्यास अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने दूर करा. व्यवसायात योग्य क्रम ठेवा. वातावरणातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
कुंभ : प्रतिस्पर्धी क्षेत्रात सक्रिय असू शकतात
कुंभ : वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. विद्यार्थी अभ्यासावर आणि त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील. आज वादविवाद टाळा. प्रतिस्पर्धी क्षेत्रात सक्रिय असू शकतात.
मीन : आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला पूर्ण वेळ द्याल
मीन : आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला पूर्ण वेळ द्याल. तुमच्या अडचणीत तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून योग्य सहकार्य मिळेल. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.