रत्नागिरी : तालुक्यातील एका आठ वर्षीय मुलीशी वृद्धाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. झाल्या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने पालकांजवळ हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पिडीतेच्या पालकांनी याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
श्रीकांत नारायण पेडांमकर (65, रा.रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. आरोपी हा 8 डिसेंबर रोजी पिडीत अल्पवयीन मुलीला चिरफले जमा करण्यासाठी सोबत घेवून गेला होता. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी याने पिडीत मुलीशी गैरप्रकार केला. या घटनेने घाबरुन गेलेल्या मुलीने घरी आल्यानंतर सर्व हकिगत आपल्या पालकांना सांगितली. पिडीतेच्या नातेवाईकांनी या प्रकरणानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.