विभागस्तरावर शासकीय गटात लांजा नं.5 तृतीय
जिल्हास्तरावर चिपळूणची मांडकी खूर्द प्रथम
खासगी गटात संगमेश्वरमधील महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई प्रथम क्रमांक
रत्नागिरी :-‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा (टप्पा 2)’ अभियानातील जिल्हास्तरीय निकाल घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये शासकीय गटात विभागस्तरावर जि.प.प्राथमिक शाळा लांजा नं.5 ने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर या गटातून जिल्हास्तरावर चिपळूणमधील मांडकी खुर्द शाळेने प्रथम क्रमांक व खासगी गटात जिल्हास्तरावर संगमेश्वरमधील महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कडवईने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान 5 ऑगस्ट 2024 ते 4 सप्टेंबर 2024 पर्यंत राबविण्यात आलेले आहे. त्यानंतर केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरुन या अभियानाअंतर्गत सहभागी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले.
मूल्यांकनाचा विभाग व जिल्हा स्तरावरील निकाल खालीलप्रमाणे:-
▪️विभागस्तरीय निकाल- शासकीय गटातून जि.प.पू.प्रा.शाळा लांजा नं.5 ने तृतीय क्रमांक
▪️शासकीय गट जिल्हास्तरीय निकाल – जि.प.प्राथमिक शाळा मांडकी खूर्द, चिपळूण प्रथम क्रमांक
▪️ जि.प. प्राथमिक शाळा मळे, दापोली ने द्वितीय क्रमांक
▪️तर जि.प.प्राथमिक शाळा पूर, संगमेश्वर तृतीय क्रमांक पटकावला आहे.
खासगी गट- जिल्हास्तरावर संगमेश्वरमधील महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कडवईने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
▪️तर न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे, दापोली ने द्वितीय क्रमांक, आणि रामेश्वर विद्यालय कोंडगे, लांजा ने तृतीय क्रमांक पटकावला आहे.