रत्नागिरी:-ख्रिसमससह नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याच्य दिशेने जाणाऱ्या पर्यटकांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाडयाना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी सायंकाळी सीएसएमटी-करमाळी, एलटीटी-कायुवेली साप्ताहिक, पुणे-करमाळी साप्ताहिक स्पेशल जाहीर केल्या. स्पेशलच्या 48 फेऱ्या धावणार असल्याने पर्यटक सुखावले आहेत. यातील सीएसएमटी-करमाळी व पुणे-करमाळी स्पेशलचे 14 डिसेंबरपासून आरक्षण खुले होणार आहे.
01151/01152 क्रमांकाच्या सीएसएमटी-करमाळी नियमित स्पेशलच्या 20 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान 34 फेऱ्या धावणार आहेत. सीएसएमटी येथून रात्री 12.20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 1.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात करमाळी येथून दुपारी 2.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता सीएसएमटीला पोहोल. 22 डब्यांची स्पेशल दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम स्थानकात थांबेल.
01463/01464 क्रमांकाची एलटीटी-कायुवेली साप्ताहिक स्पेशालच्या 8 फेऱ्या धावणार आहेत. 19, 26 डिसेंबर, 2, 9 जानेवारी रोजी धावणारी स्पेशल एलटीटी येथून सायंकाळी 4 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता कोचीवेली येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात 21, 28 डिसेंबर, 4 व 11 जानेवारी रोजी धावणारी स्पेशल कोच्युवेल्ली येथून सायंकाळी 4.20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 12.45 वाजता एलटीटीला पोहोचेल. या स्पेशलला 22 एलएसबी डबे जोडण्यात येणार आहे.
01407/01408 क्रमांकाच्या पुणे-करमाळी साफ्ताहिक स्पेशलच्या 6 फेऱ्या धावणार आहेत. 25 डिसेंबर, 1 व 8 जानेवारी दरम्यान, धावणारी स्पेशल पुणे येथून पहाटे 5.10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता दुसऱ्या येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात करमाळी येथून रात्री 10.20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता पुणे येथे पोहोचेल.
17 डब्यांच्या स्पेशलला चिंचवड,, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आदी स्थानकात थांबे आहेत.