खेड : तालुक्यातील नातूनगर बसथांब्यानजीक रात्रीच्या सुमारास दारू पिण्याचा कोणताही पुरावा नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत आरडाओरडा करून शांतता भंग केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिलिंद चंदू शिंदे (54), मुकुंद बाळाराम शिंदे (74), अरविंद काशिराम शिंदे (38, तिघेही रा. वावेतर्फे नातू खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ते मद्यप्राशन करत असताना मोठमोठयाने आरडाओरडा करत होते. ही बाब पोलिसांना कळल्यानंतर घटनास्थळी पोहून तिघांना रंगेहाथ पकडले. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा गावित यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.