तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथे रस्त्याने चालत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीशी गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी त्याला पोलिसांनी अटक करुन न्यायालयापुढे हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
विकास विजय माने (25, ऱा कारवांचीवाडी रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी ही 10 डिसेंबर रोजी खेडशी परिसरातून घरी चालत जात होती. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी याने पिडीतेच्या जवळ येवून तिच्याशी गैरवर्तन केले. यावेळी पिडीतेने आरडा-ओरडा केल्याने संशयिताने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. घडल्या घटनेची गंभीर दखल घेवून पिडीतेच्या वडिलांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 75 (1)(आय) व बालकांचे लैगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) चे कलम 8 नुसार गुन्हा दाखल केल़ा तसेच संशयिताला पोलिसांकडून अटक करत न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.