खेड : खेड चिपळूण मार्गावरील रस्त्याचा पुलाजवळ येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 2175 रूपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी महेंद्र मनोहर उतेकर (39 रा. धामणंद-पायरवाडी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तो विनापरवाना विदेशी मद्याची विक्री करत आयाची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. याबाबत महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रद्धा मोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.