लांजातील इनोव्हा चालकावर गुन्हा
रत्नागिरी : रत्नागिरी-पावस मार्गावरील भाटये येथे वॅगनार व इनोव्हा कारमध्ये धडक होवून अपघात झाला. ही घटना 5 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी इनोव्हा कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला. अनंत बाळकृष्ण जाधव (ऱा लांजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अनंत जाधव हा 5 डिसेंबर रोजी इनोव्हा कार (एमएच 02 सीएल 7853) घेवून पावस-रत्नागिरी रस्त्याने जात होते. तर सिद्धी सुनील कोकरे या आपल्या ताब्यातील वॅगनार (एमएच 46 बीझेड 7029) घेवून गोळप ते रत्नागिरी अशा प्रवास करत होत्या. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्या हॉटेल कोहीनुर भाटये येथे आल्या असता अनंत जाधव यांनी आपल्या ताब्यातील इनोव्हा कारने मागून वॅगनारला धडक दिल़ी अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.