संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित कै. द . ज. कुलकर्णी कोकण विभागीय कथाकथन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत कोकणातील विविध भागांतील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचन, संभाषण कौशल्य आणि साहित्यप्रेम वाढवणे हा होता. सहभागी स्पर्धकांनी विविध कथांमधून संस्कार, समाजप्रबोधन, शौर्य आणि मूल्य शिक्षण यांचा प्रभावीपणे आविष्कार सादर केला.
स्पर्धेचे उद्घाटन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिरीष फाटक आणि कनिष्ठ महाविद्यालय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून श्रीम. मीराताई पोतदार आणि डॉ. वर्षा फाटक उपस्थित होत्या.
स्पर्धेतील खालील विजेत्यांना प्रमाणपत्रे व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
प्रथम क्रमांक- मीरा मनोज पोंक्षे (डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण).
द्वितीय क्रमांक- वेदांत विश्वास वकटे (डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण).
तृतीय क्रमांक- कावेरी राकेश चव्हाण (अण्णासाहेब बेहरे महाविद्यालय, लवेल).
उत्तेजनार्थ –१) उमा सुनील तावडे (माध्यमिक आश्रम शाळा जुनिअर कॉलेज, निवे).
२) श्रुती प्रवीण पाटील (गुरुवर्य काकासाहेब सप्रे कॉलेज, देवरुख).
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शिरीष फाटक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. सुनिल वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. संचिता चाळके, प्रा. देवयानी जोशी, प्रा. शिवराज कांबळे, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेच्या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्याप्रती असलेल्या आकर्षणाला नवा आयाम मिळाला आहे.