खेड/ सुदर्शन जाधव-जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ व निधी संकलन, शौर्यपदकधारक तथा वीर नारी सन्मान कार्यक्रम मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात मा.एम देवेंदर सिंह (जिल्ह्याधिकारी रत्नागिरी),मा.कीर्ती किरण पुजार(मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी),मा.धनंजय कुलकर्णी(जिल्हा पोलीस अधिकारी रत्नागिरी),मा.शंकर बर्गे (अपर जिल्ह्याधिकरी रत्नागिरी) तसेच अनेक मान्यवर आणि माजी सैनिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात शौर्य पदक,युध्द विधवा,वीर माता पिता,विशेष गौरव पुरस्कार प्राप्त माजी सैनिक,विधवा,पाल्य यांचा सत्कार करण्यात आला.१९७१ च्या युद्धात उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल चोरवणे गावचे सुपुत्र कॅप्टन लक्ष्मण गोविंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.३ ऑगस्ट १९६४ रोजी लक्ष्मण गोविंद शिंदे भारतीय सैन्यात भरती झाले.१९७१ च्या युद्धात कॅप्टन शिंदे यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली.इंजिनिअर टीमवर पूर्ण युद्धाची जबाबदारी होती. पूल बांधणे,हेलिपॅड उतरण्यासाठी जागा तयार करणे,रात्री ९ ते पहाटे पर्यत काम करण्याची जबाबदारी बटालियनवर होती.
१९७१ च्या युद्धात महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल कॅप्टन लक्ष्मण गोविंद शिंदे यांना सशस्त्र सेना ध्वज दिनी गौरविण्यात आले.