रत्नागिरी:-येत्या ८ ते १२ जानेवारी २०२५ या काळात रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या सन्मानिका शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मनामनात हिंदुत्वाचा अंगार फुलवणारा, चैतन्य निर्माण करणारा, राष्ट्रप्रेम जागवणारा, संस्कृती जपणारा, सामाजिक प्रबोधनाचा ध्यास घेतलेला कीर्तनसंध्या महोत्सव येत्या जानेवारी महिन्यात रत्नागिरीत स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुलात होणार आहे. महाभारत हा व्यापक विषय राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्त आफळे बुवा आपल्या नेहमीच्या शैलीत उलगडणार आहेत. पारंपरिक आर्या, साकी, दिंडी यांचा समावेश, तसेच बरोबरीने कथेच्या अनुषंगाने काही निवडक नाट्यगीतांचाही अंतर्भाव त्यात असेल. या कीर्तन महोत्सवासाठी पितांबरी उद्योग समूह यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून वृद्ध, ज्यांना खाली मांडी घालून बसता येत नाही अशांसाठी खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी देणगी सन्मानिका ठेवण्यात आल्या आहेत. देणगी सन्मानिका कार्यक्रमाला येताना सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. देणगी सन्मानिका रत्नागिरीत उपलब्ध असलेली ठिकाणे आणि संपर्क क्रमांक असे –
मानस जनरल स्टोअर्स, अवधूत जोशी, माळनाका (९०११६६२२२०), २) श्री धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय, उमेश आंबर्डेकर, मारुती मंदिर (९४२३२९२४३७), ३) सोहम एन्टरप्रायझेस, नितीन नाफड, माळ नाका (८३०८८१३१५८), ४) गुरुकृपा रेडीओ हाऊस, टिळक आळी (९८९०८२७००६), ५) आगाशे स्टोअर्स, साळवी स्टॉप (९७३०३१०७९९), ६) आगाशे फुडकोर्ट, साळवी स्टॉप (९७३०३१०७९९), ७) श्रीकांत सरदेसाई (९४२११४२४९८), ८) मकरंद करंदीकर (९२८४७६७३७६), ९) गुरुप्रसाद जोशी (९५५२५४६४६८), १०) महेंद्र दांडेकर, नरहर वसाहत, शिवाजीनगर (७४१०१०४४३३), ११) रत्नाकर जोशी, डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद बस स्टॉपजवळ, मेन रोड (९४२२०५२६१३), १२) मधुसूदन बेंडे (९४२३८१७५११), १३) राजन पटवर्धन (९८६०३६६९९१), १४) चिन्मय भागवत (८८८८७९८८४५), १५) श्रीनंदन केळकर, पऱ्याची आळी (७०८३९०९१०९), १६) श्रीराम गोडबोले, पावस (९४२१२३८८२४), १७) अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, अनिकेत कोनकर, श्रीनगर, खेडशी (९४२३२९२१६२).
कीर्तन महोत्सवासाठी असणारी साथसंगत अशी – तबला (केदार लिंगायत), पखवाज (प्रथमेश तारळकर), हार्मोनियम (चैतन्य पटवर्धन), व्हायोलिन (उदय गोखले), एबल्टन, साइड ऱ्हिदम (अमेय किल्लेकर, शार्दूल मोरे).
कीर्तन महोत्सवाचे अजून एक वैशिष्ट्य असे कू, महाभारत या विषयाचा प्रचंड मोठा आवाका लक्षात घेऊन तो अधिक समजण्यासाठी चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांची महाभारतातील अपरिचित गोष्टी या शीर्षकाची १८ लेखांची लेखमाला २० डिसेंबरपासून वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावरून प्रसारित केली जाणार आहेत.
गेली तेरा वर्षे सातत्याने रत्नागिरीत चालू असणारा हा समाजप्रबोधनाचा जागर रसिक श्रोत्यांच्या सहकार्यातून अधिकाधिक उत्तम करण्यात यश आले आहे. असेच सहकार्य यंदाही सर्वांकडून मिळेल अशी खात्री आहे. महोत्सवाला मित्रपरिवार, आप्तेष्ट नातेवाईकांसोबत उपस्थित राहावे आणि आपला देदीप्यमान इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराने केले आहे.