तुमच्या मोबाईलवर वारंवार फसवे कॉल्स येतात. आणि त्याला आपण वारंवार कंटाळून जातो. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय या सर्वावर लक्ष ठेवून असते. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवे नियम आणत असते. रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्हीआय सिमकार्ड वापर कर्त्यांसाठी ट्रायने एक आनंदाची बातमी दिली आहे.
11 डिसेंबर 2024 पासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) संदेश ट्रेसेबिलिटी नावाचा नवीन नियम लागू केला आहे.
तुमच्या मोबाईलवर येणारे स्पॅम मेसेज कमी करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. दररोज अनेक फसवे, स्पॅम मेसेज आणि कॉल्स येता. पण यांचा मूळ स्त्रोत शोधणे कठीण असते. यात बदल करण्यासाठी ट्रायने महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे लोकांची फसवणूक होणार नाही. या नवीन प्रणालीमुळे मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीपासून ते पोहोचवणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा शोध घेता येणार आहे.
स्पॅम मेसेज संदर्भात ट्रायने एक पारदर्शी प्रक्रिया तयार केली आहे. ज्यामध्ये टेलीमार्केटरसारखे लोक देखील सामील होतील. नवीन नियमामुळे बँकिंग आणि इतर सेवांसाठी ओटीपीसारखे महत्त्वाचे मेसेज येण्यास उशीर होणार नाही याचीही काळजी ट्रायने घेतली आहे. हे महत्त्वाचे मेसेज वेळेवर पोहोचतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या नवीन नियमानुसार, नोंदणी नसलेले प्रमोशनल मेसेज आणि स्पॅम ब्लॉक केले जातील. यामुळे यूजर्सना जाहिराती आणि प्रचारात्मक मेसेज ओळखणे सोपे होईल. यासाठी 27 हजारहून अधिक कंपन्यांनी आधीच नोंदणी केली असून प्रक्रिया वेगाने सुरू आहे. एकूणच काय तर नवीन नियमामुळे प्रत्येक मोबाईल युजरला आलेला मेसेज सुरक्षित आणि पारदर्शक असेल.