रत्नागिरी : शहरालगतच्या भाट्ये समुद्रात फिरण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला मृत्यूच्या जबड्यात बाहेर कडण्यात स्थानिक मच्छीमार तरुण आणि रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले.
मंगळवारी संध्याकाळी रत्नागिरी शहराजवळच्या भाटये समुद्र किनारी कोहिनूर पॉईंट ठिकाणी फिरण्यासाठी एक दाम्पत्य गेले होते. पण समुद्राच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली. अजस्त्र लाटा किनाऱ्याला धडकू लागल्या. त्यामुळे त्या ठिकाणावरून सुरक्षितरीत्या बाहेर पडणे या दाम्पत्याला अशक्य झाले. त्यांनी मोबाईल वरून रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फोन करून कल्पना दिली. पण निसर्गापुढे आणि समुद्राच्या अजस्त्र लाटांपुढे पोलिसांना देखील मर्यादा आल्या.
बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये हे मच्छीमार तरुण देखील त्यांच्या मदतीसाठी धावले. या तरुणांनी देखील आपल्या जीवाची बाजी लावत दाम्पत्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले.