रत्नागिरी : आपतकालीन स्थितीत कशा पद्धतीने निर्णय घेत संकटकालीन परिस्थितीवर मात करायची याची प्रात्यक्षिके नुकतीच एन डी आर एफ व कोकण रेल्वेच्या टीमने रत्नागिरीत करून दाखवली. यावेळी कोकण रेल्वेसह रत्नागिरी जिल्हा प्रशासनातील विविध खात्यांचे कर्मचारी , अधिकारी उपस्थित होते.
आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर सर्वप्रथम जिल्हाप्रशासनाच्या विविध विभागांना सतर्क होऊन काम करावे लागते. परिस्थिती गंभीर असेल तर अशा स्थितीत एन डी आर एफ च्या टीम ला पाचारण केले जाते. नुकतीच एन डी आर एफ च्या एका टीम ने रत्नागिरी जिल्ह्याला भेट देत कोकण रेल्वे सह विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर केली. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.