पळस्पे ते वाशी नाका पहिल्या टप्प्यात प्रकाशमान
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर सद्या पथदीप लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे आता महामार्ग प्रकाशमान होणार आहे. या महामार्गावर पहिल्या टप्प्यात पळस्पे ते वाशी नाका दरम्यान पथदीप लावण्याचे काम सुरू झाले आहे. रस्त्यावर पथदीपांच्या माध्यमातून हा टप्पा प्रथम प्रकाशमय होणार आहे.
या महामार्गावरील खड्डे, अर्धवट असणारे सर्व्हिस रोड दुभाजकांची दुरवस्था अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या या महामार्गावर आता पथदिवे लावले जात असल्याने वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. नाताळची असणारी सुट्टी लक्षात घेता, रायगड आणि कोकणात असणारी अनेक पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजणार आहेत. त्यामुळे येत्या डिसेंबर अखेरपर्यंत हे पथदिवे उजळणार असून, दिवे प्रकाशमय होणार असल्याने प्रवाशीदेखील समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.