कर्नाटक सरकारचा केला निषेध
रत्नागिरी : बेळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे. सावरकर व रत्नागिरीचे नाते अतूट आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या हिटलरशाहीचा शिवसेना उपनेते तथा आमदार उदय सामंत यांनी महाराष्ट्र व रत्नागिरीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सामंत हे बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित होते. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोठा मेळावा होणार होता. त्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेते, आमदार, खासदार जाणार होते. पण कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने महाराष्ट्रातील या सर्वांना विरोध करत बंदी घातली होती. ही बाब निषेधार्ह आहे. लोकशाहीत संविधानाने दिलेले अधिकारावर कर्नाटक सरकारने घातलेला हा घाला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
कर्नाटक सरकारी ही हिटलरशाही सुरू असता त्यापुढे जाउन या सरकारने स्वा.वि.दा.सावरकर यांचा अपमान केला आहे. हा अपमान रत्नागिरीकर आणि महाराष्ट्राच्यावतीने सामंत यांनी निषेध नोंदवला. कारण सावरकर आणि रत्नागिरी यांचे अतुट नाते आहे. या दरम्यान प्रियांका चर्तुवेदी यांनी सीमा भागाबाबत दिलेल्या पत्राबाबत सामंत म्हणाले की, असे पत्र देणारे किती वेळा गेले. महायुतीचे सरकार सीमा भागातल्या लोकांसोबत आहे हे आम्ही सिद्ध केलं आहे. काही लोक फक्त पत्र लिहितात. महाविकास आघाडीच्या वेळेला सीमा भागातील लोकांसोबत किती वेळा बैठका झाल्या. जे तिथे गेले नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगाचं नाही. त्यांना त्या सीमावासियांच्या व्यथा कळणार नाहीत. काँग्रेस सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांवर अन्याय, अत्याचार करत आहे. पण महाराष्ट्रातील हायुतीचे सरकार त्या बांधवांच्या पाठीशी राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.