खेड : तालुक्यातील नांदगाव-बौद्धवाडी येथील 54 वर्षीय प्रौढाचा सोमवारी सकाळच्या सुमारास डेरवण रूग्णालयात आकस्मिक मृत्यू झाला. श्रीधर सोनू तांबे असे मृत प्रौढाचे नाव आहे.
तांबे यांना 8 डिसेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास अचानक दम भरल्यानंतर तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डेरवण येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता त्यांना मृत घोषित केले.