गुहागर : बांग्लादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कानच्या साधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, अशा मागणीचे निवेदन देत गुहागरमध्ये विश्व हिंदु परिषदेतर्फे मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठया प्रमाणात सर्व समाजातील जनतेने हजेरी लावली होती.
विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री अनिरूद्ध भावे, माजी आमदार डॉ. विनय नातू,, प्रखंड मंत्री बबन कुंभार, ऍड. संकेत साळवी, व्याघ्रांबरी ग्रामदैवतचे अध्यक्ष शरद शेटये, गौरव वेल्हाळ, श्रीकृष्ण बेलवलकर, राजेश बेंडल आदींच्या उपस्थितीत गुहागर शिवाजी चौक येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चासंदर्भात उपस्थितांना माहिती देऊन गुहागर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये 263 पुरुष व 98 महिला सहभागी झाल्या होत्या.