रत्नागिरी:-तालुक्यातील खंडाळा येथे मटका-जुगारावर जयगड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केल़ी. यावेळी अवैधरित्या मटका-जुगार चालविणाऱ्या संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश मोहन अवघडे (46, ऱा खंडाळा कोकण नगर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
खंडाळा आठवडा बाजार येथे मटका-जुगार चालविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार 9 डिसेंबर रोजी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी संशयित आरोपी हा मटका जुगार चालवित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी मटका-जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केला.