संगमेश्वर तालुका हिवाळी क्रीडा स्पर्धा
संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथील विघ्नेश संदीप सालीम या विद्यार्थ्याने प्रभागस्तरावरील लांब उडी, उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कब्बडी आणि खो खो स्पर्धेतही विशेष प्राविण्य मिळवल्याने त्याचा सत्कार करण्यात आला.
वांद्री येथे प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मंदिर ब्राह्मणवाडी वांद्री येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत प्रभागस्तरावरील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा नंबर 2 चा इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या विघ्नेश संदीप सालीम याने एकूण चार क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवले. उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक, लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक तसेच कबड्डी आणि खो खो मध्येही उत्कृष्ट कामगिरी करत त्याने विशेष प्रावीण्य मिळवले. या यशाने त्याने पालक व शाळेचे नाव रोशन केले आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. शाळा, ग्रामस्थ व कुटुंबियांकडून त्याच्यावर शुभेच्छासह अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.