रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे गोडावून स्टॉप येथे घराचे बांधकाम करत असताना तरुण 20 फुटावरुन खाली कोसळून जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. शंकर दादासो लोहार (42, ऱा पाटण सातारा सध्या खेडशी रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत.
शंकर हा नाचणे गोडावून स्टॉप येथे घराचे बांधकामाचे कामावर होता. 10 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास शंकर हा बांधकामाला लावलेल्या सज्याच्या लाकडी पट्ट्या काढण्याचे काम करत होता. यावेळी त्याचा पाय घसरुन तो 20 फुटावरुन खाली कोसळला. या घटनेत त्याला दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.