रत्नागिरी : लग्न करण्याच्या आणाभाका घेवून रत्नागिरीतील 25 वर्षीय तरुणीशी शरीरसंबंध ठेवणाऱ्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल़ा. गोविंद अनंत घवाळी (45, रा.मिऱ्याबंदर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. गोविंद याला पोलिसांनी अटक करुन मंगळवारी न्यायालयापुढे हजर केल़े यावेळी त्याची रवानगी 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली.
संशयित आरोपी हा गवंडी काम करत असून त्याने पीडितेशी ओळख निर्माण केली. तसेच तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर ऑगस्ट 2023 ते 6 डिसेंबर 2024 या कालावधीत विविध ठिकाणी नेत तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित केल़े. पीडितेने शरीरसंबध ठेवण्यास नकार दिला अथवा तिने अन्य कुणाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर संशयित हा तिला मारहाण व शिवीगाळ करत असे, अशी तक्रार पीडितेने रत्नागिरी शहर पोलिसात दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी संशयिताविरुदद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 64,115 (2), 352 नुसार गुन्हा दाखल केला. तसेच सोमवारी रात्री उशिरा त्याला अटक करुन मंगळवारी न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्याला 13 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे