रत्नागिरी: रत्नागिरी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी अविनाश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनची सभा नुकतीच पार पडली. फेडरेशनचे कार्य जलद गतीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने कार्यकारी मंडळ आणि कार्यकारिणीची नव्याने फेररचना करण्यात आली.
यावेळी अविनाश कुळकर्णी यांची अध्यक्षपदी तर नावेद मेमन यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सेक्रेटरी पदी तुषार मलुष्टे तर खजिनदार पदी अभिजीत मुळे यांची निवड करण्यात आली. २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारिणीच्या कार्यकारी मंडळावर नावेद मेमन, गिरिधर उर्फ राजा पटवर्धन, अजिंक्य फडके, मानस देसाई, अरबाज अकबानी, तुषार मलुष्टे, विक्रांत पटवर्धन, अभिजीत मुळे, ओंकार मलुष्टे, आनंद शेठ देवस्थळी यांची कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
एक रहेंगे तो सेफ रहेंगे हे ध्यानात घेऊन आपण सर्वांनी एकत्र राहुन व्यावसायिक प्रगती साधली पाहिजे असे मत माजी अध्यक्ष अन्वर मेमन यांनी व्यक्त केले. तर व्यवसाय करताना डिस्ट्रीब्यूटर्सना येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून त्या समस्या मार्गी लावण्यासाठी आपण कटिबध्द असू. याशिवाय जीएसटी व फूड लायसन्स यासंदर्भात मार्गदर्शक मेळावे आयोजित करून सर्व डिस्ट्रीब्यूटर्स ना सोबत घेऊन आपण काम करू असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश कुळकर्णी यांनी केले.