रत्नागिरी : समुद्रात मतलई वारे वाहत असले, तरी मासेमारी करण्यावर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, समुद्रात सलग तीन दिवस ते आठवड्यापर्यंत मासेमारी करण्यासाठी जाणार्या मच्छीमार नौका पहाटे समुद्रात जाऊन सकाळी बंदरात परत येत आहेत.
त्याचबरोबर वार्यामुळे मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले. वार्यामुळे मासा स्थलांतरित होत असल्याने मासळी मिळण्याचा ‘रिपोर्ट’ चांगला नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला असून, सुमारे 2 हजार 500 यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी नौका मासेमारी करतात.वातावरण शांत किंवा अनुकूल असेल तेव्हा यातील काही नौका समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका तीन दिवसांपासून आठवड्यापर्यंत मासेमारी करतात मात्र, आता समुद्रात मतलई वारे वहात असल्याने गेल्या आठवड्यापासून मासेमारी नौका पहाटे समुद्रात मासेमारीसाठी जाऊन संध्याकाळी बंदरात परत येत आहेत.
मासेमारीसाठी जाणार्या नौकांना मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने काही नौका मासेमारीसाठी न जाता समुद्रातच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे वार्यामुळे होणारा धोका आणि मासळी मिळत नसल्याने होणारा तोटा कमी करण्याचा प्रयत्न नौका मालकांकडून केला जात आहे.
मतलई वार्याचा मासेमारीवर परिणाम झालेला नाही. नौका रोजच्या रोज मासेमारीसाठी जात आहेत. मात्र समुद्रातील अनेक दिवसांची सलग मासेमारी मात्र बंद झाली आहे. ज्या नौका मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत त्यांना होणार्या खर्चाइतकीही मासळी मिळत नसल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे.