मेष : गुंतवणूक सुरू करण्यासाठी चांगली वेळ
मेष : आजचा दिवस व्यस्त असेल. गुंतवणूक सुरू करण्यासाठी चांगली वेळ आहे. मुलांना लाभलेल्या यशाने सुखावाल. रागावर नियंत्रण ठेवा. प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास कायम ठेवा. व्यावसायिक सहली टाळा. घरातील वातावरण प्रसन्न राहिल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
वृषभ : प्रतिष्ठित व्यक्तीसोबत झालेली भेट फायदेशीर ठरेल
वृषभ : आज एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत झालेली भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचे निस्वार्थ योगदानामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल. व्यावसायिक कामे पूर्वीपेक्षा चांगली होतील. कौटुंबिक व्यवस्था व्यवस्थित राहील. आरोग्य चांगले राहिल.
मिथुन : समजूतदारपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा
मिथुन : आज कोणत्याही कामाचे नियोजन सुरू करण्यापूर्वी दोनदा विचार करा. प्रारब्धाऐवजी कर्मावर विश्वास ठेवा. जवळच्या नातेवाईकाशी सौम्य वाद होऊ शकतात. समजूतदारपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क : दिवसाची सुरुवात खूप अनुकूल राहील
कर्क : दिवसाची सुरुवात खूप अनुकूल राहील. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात बेफिकीर राहणे योग्य ठरणार नाही. पती-पत्नीचे जवळचे भावनिक आणि विश्वासाचे नाते असेल. आरोग्य उत्तम राहिल.
सिंह : तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकाल
सिंह : आजचा दिवस सामान्य जाईल. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकाल. कौटुंबिक समस्या सोडविण्यास तुमचे प्राधान्य असेल. जवळच्या नात्यातील गैरसमजामुळे संबंध बिघडू शकतात. व्यावसायिक कामे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
कन्या : व्यवसायात सध्या कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका
कन्या : आज घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. कौटुंबिक समस्या समन्वयातून सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सध्या कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आरोग्य चांगले राहिल.
तूळ : खर्चावर नियंत्रण ठेवणे चांगले
तूळ : कुठेतरी दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती चांगली राहिल. विशेष कामे पूर्ण करण्यासाठी जवळच्या मित्राचा सल्ला उपयुक्त ठरेल. सामाजिक संस्थेत तुमचे विशेष योगदान असेल. शेजाऱ्यांशी वाद टाळा. विद्यार्थी अभ्यासात निष्काळजी राहू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे चांगले. कुटुंबात सहकार्य आणि योग्य समन्वय राहील. महिला आरोग्याची विशेष काळजी घेतील.
वृश्चिक : कोणत्याही व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही
वृश्चिक : आज एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. सकारात्मक कार्यात थोडा वेळ घालवा. कोणत्याही व्यवसायातील गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल नाही. पती-पत्नीमधील सलोखा गोड राहील.
धनु : आज सकारात्मक विचाराचे शुभ परिणाम मिळतील
धनु : आज सकारात्मक विचाराचे शुभ परिणाम मिळतील. उत्पन्न आणि खर्चात समानता असू शकते. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता राहिल.
मकर : अडकलेली कामे पूर्ण होतील
मकर : घरातील काही महत्त्वाची कामे करताना इतर सदस्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. अचानक काही अडकलेली कामे पूर्ण होतील. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल असू शकते. व्यवसायिक कामे सामान्य राहतील.
कुंभ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील
कुंभ : आज प्रलंबित आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. घरात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मीन : संयम राखणे शहाणपणाचे ठरेल
मीन : आज आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. संयम राखणे शहाणपणाचे ठरेल. जोडीदाराच्या सहकार्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतील. अनियमित खाण्याने आरोग्याच्या समस्या जाणवतील.