आमदार उदय सामंत यांचे भाजपचे कार्यकर्ते शेखर लेले यांना आश्वासन
रत्नागिरी : रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे रत्नागिरीत आगमन होताच भाजप कार्यकर्ते शेखर लेले , संजय आठल्ये व प्रणित लेले यांनी भेट सामंत यांची भेट घेतली. प्रथम त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 5 मधील छत्रपतीनगर परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत चर्चा केली. यावेळी आमदार उदय सामंत यांनी छत्रपतीनगर मधील रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण करून देण्याचे आश्वासन लेले यांना देण्यात आले.
दरम्यान रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर असताना भाजप कार्यकर्ते शेखर लेले, संजय आठल्ये व प्रणित लेले यांनी छत्रपतीनगर येथील रस्त्यावरील खड्ड्यासंदर्भात एक निवेदन देत आमदार सामंत यांचे लक्ष वेधले. या रस्त्याची परिस्थिती त्यांनी कथन केली. त्यानंतर आमदार उदय सामंत यांनी हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.