रत्नागिरी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज सकाळी 11 वाजता मानवी हक्क दिन कार्यक्रम संपन्न झाला.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास तसेच संविधानाच्या उद्देशिकेस अभिवादन करून मानवी हक्क दिनाचे महत्व विशद केले. मानवी हक्काचा वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनामध्ये कसा उपयोग होतो याबाबत यथोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन संकुलातील सर्व कार्यालयातील, विविध आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.