रत्नागिरी : शहरातील जीजीपीएस शाळेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाची इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक क्षेत्रभेट सहल नुकतीच गोवा येथे आयोजित केली होती. विद्यार्थ्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून गोवा दर्शन घडवणे हा या सहलीमागचा उद्देश होता.
सहलीच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी ‘बोंडोला येथील प्राणीसंग्रहालय पाहिले. या दिवशी विजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना पंचकोशाधारित जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गोवा सायन्स सेंटर व प्लॅनेटोरियम आणि भारतातील सर्वात जुने सार्वजनिक वाचनालय असलेल्या गोवा स्टेट लायब्ररीला भेट दिली. हे आशियातील सर्वात मोठे वाचनालय आहे. सहलीच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी गोवा विधानभवन पाहण्यास गेले. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव खूपच अविस्मरणीय होता. विद्यार्थ्यांनी अनंत देवस्थान, महलसा नारायणी मंदिर, विजयादुर्गा मंदिर अशी काही प्राचीन मंदिरेही पाहिली. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गोव्यातील नेस्ले कंपनी च्या चॉकलेट बनवणार्या भारतातील एकमेव फॅक्टरीलाही भेट दिली
यावेळी विद्यार्थ्यांसोबत वासुदेव परांजपे, अमोल पाष्टे, श्रद्धा टिकेकर हे शिक्षक सहभागी झाले होते. र. ए .सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांची गोवा विधानभवन भेटीसाठी विशेष मदत झाली . हा उपक्रम गुरुकुल प्रकल्पप्रमुख नितीन लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जीजीपीएस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सोनाली पाटणकर आणि र. ए.सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.