दापोली : तालुक्यातील खेर्डी पानवळी येथील चिरेखाणीवरील वायर चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात सुरेश सोनू पवार (३३, रा. वळवण सोंडेघर, दापोली, मूळ रा. कोसवे खुर्द, माणगाव, रायगड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वायरची किंमत ६० हजार इतकी आहे.
याप्रकरणी खाण मालक प्रीतम पांडुरंग केळकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खाणीवर काम करणारे श्रवण चव्हाण यांनी प्रीतम केळकर यांना फोनवरून वायर चोरीला गेल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी खाणीवर जाऊन मजुरांसह आजूबाजूला पाहणी केली. त्यावेळी खाणीपासून ५० मीटर अंतरावर ही वायर जाळून चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सुरेश पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.