रत्नागिरी:-लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ विद्या अजित साळवी (आठवले) ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत.
त्यांचा सेवानिवृत्तीपर गौरव समारंभ उद्या बुधवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
आठवले यांनी आपल्या तीन दशकांच्या कालखंडात इंग्रजी व संस्कृत विषयाचे अध्यापन केले. त्यांचे भाषेवरील प्रभुत्व व अध्यापनाची तळमळ या गुणांमुळे विद्यार्थ्यांना त्या विषयांची अभिरुची निर्माण झाली. आठवले यांनी आपल्या सर्जनशीलतेतून दर्जेदार कथा, कविता लिहिल्या. शिक्षणासोबतच साहित्यिक गुणांमुळे त्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामधील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गीतगायन, वक्तृत्व, निबंध, काव्य लेखन, लोकसंख्या शिक्षण मॉडेल आधी उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठा लोकसंपर्क गोळा केला आहे.
त्यांच्या सेवानिवृत्तीपर समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कुवारबावच्या जागुष्टे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रवींद्र दत्तात्रय इनामदार उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये भूषविणार आहेत. समारंभाला आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक सुनील पाटोळे यांनी केले आहे.