पाली : डी.जे सामंत वरिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र व भूगोल विभागाच्या वतीने अंतर्गत मूल्यमापनाच्या अभ्यासाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी चरवेली येथील महाराष्ट्र काजू कारखान्यास भेट दिली. विद्यार्थ्यांना कृषी उद्योगाविषयी व्यावहारिक ज्ञान मिळावे. हा या क्षेत्रभेटीचा उद्देश होता. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी काजू उत्पादन प्रक्रियेचे निरीक्षण केले. कारखान्याचे व्यवस्थापक दशरथ मोरे व इतर कर्मचारी यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधून कामकाजाची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी आणि कृषी उद्योगातील वास्तविकता त्यांच्यासमोर आणण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र व भूगोल विभागाचे प्रा. प्रज्ञा तांबे प्रा.प्रतीक कांबळे यांनी क्षेत्रभेटीचे आयोजन केले.