टेक्नॉलॉजी : व्हॉट्सॲपवर सकाळी पाठवलेला मेसेज दुपारी पोहोचल्यावर आपल्याला वाटते आत्ताच मेसेज पाठवला आहे. पण तो खूप आधी पाठवलेला असतो. ही समस्या कधीकधी अडचणीचे कारण बनू शकते. कारण महत्वाची दुःखद घटना सांगण्यासाठी जर मेसेज सकाळी केला असेल आणि तो तुम्हाला दुपारी मिळत असेल तर मग उपयोगच नाही. त्यामुळे या समस्येचे आपण सहज निराकरण करू शकता.
व्हॉट्सॲपवर मेसेजची वेळ चुकीची दिसण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या फोनच्या टाइम सेटिंगमधील त्रुटी. WhatsApp तुमच्या फोनच्या सिस्टम घड्याळातून वेळ घेते. जर तुमच्या फोनच्या घड्याळात अचूक वेळ आणि तारीख सेट केली नसेल, तर व्हॉट्सॲपवरही मेसेजची वेळ चुकीची दिसेल. याशिवाय कधी-कधी व्हॉट्स ॲपमध्ये काही तांत्रिक बिघाडामुळेही ही समस्या उद्भवू शकते.
या समस्येचे निराकरण कसे केले जाऊ शकते ते आम्ही तुम्हाला सांगतो
- तुमच्या फोनची वेळ सेटिंग्ज दुरुस्त करा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये योग्य वेळ आणि तारीख सेट करावी लागेल. यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता. तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा. “Date and Time” पर्याय निवडा. “Set time automatically” हा पर्याय चालू करा. याच्या मदतीने तुमचा फोन आपोआप इंटरनेटवरून वेळ घेईल आणि योग्य वेळ दाखवेल.
- WhatsApp अपडेट करा
काही वेळा व्हॉट्स ॲपमधील काही तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे व्हॉट्स ॲप अपडेट करावे. यासाठी तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वर जाऊन WhatsApp अपडेट करू शकता. - WhatsApp पुन्हा इंस्टॉल करा
अपडेट करूनही समस्या दूर न झाल्यास, तुम्ही WhatsApp पूर्णपणे काढून टाकू शकता आणि ते पुन्हा इन्स्टॉल करू शकता. अनेक वेळा समस्या स्वतःहून सुटते. - तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करा. कधी-कधी फोनच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काही बिघाड झाल्यामुळे व्हॉट्सॲपमध्ये अशी चूक होऊ शकते. म्हणून, तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्याचा प्रयत्न करा.