खेड : शहरातील एका फर्निचर दुकानात चोरट्याने डल्ला मारला असून दुकानातील 35 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
शहरातील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथील गाळा क्र. 9 महालक्ष्मी सेल्स फर्निचर दुकानातील 35 हजार 600 रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना 6 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञातावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. कमलेश मिश्रीमल जैन यांच्या मालकीच्या फर्निचर दुकानातील लाकडी टेबल ड्रॉव्हरमध्ये असलेली 36 हजार 600 रुपयांची रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.