रत्नागिरी : दीड वर्षापूर्वी विभाग नियंत्रक,रत्नागिरी-प्रज्ञेश बोरसे याना महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेमधील गंभीर त्रुटींबाबत पत्र दिले होते. परंतु त्याबाबत विभाग नियंत्रक यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. म्हणून भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.सतेज नलावडे यांनी सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.अजित ताम्हणकर याना भेटून जवळ जवळ सर्व बसेस मध्ये आग विझवण्याचे संयंत्र नाही किंवा कालबाह्य असल्याबाबत कारवाई करण्याचे पत्र दिले व चर्चा केली.३ प्रवासी असणाऱ्या रिक्षावर जर संयंत्र नसेल तर त्वरित कारवाई होते मग बसेस वर का नाही ही बाब निदर्शनास आणली. यानंतर सहा.उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ही बाब गंभीरपणे घेत अशा बसेस वर त्वरित कारवाई करण्याचे आदेश काढले.या वेळी भाजपा पदाधिकारी श्री.प्रशांत सनगरे उपस्थित होते.
प्रवाशांनी ही गोष्ट प्रवास करताना निदर्शनास आल्यास तत्काळ तक्रार करावी असे सूचित करण्यात आले आहे. पत्राची दखल त्वरित घेतल्याबद्दल सतेज नलावडे यांनी ताम्हणकर यांचे आभार मानले.