रत्नागिरी जिल्हा सचिव संघटनेचा प्रथम वर्धापन दिन जल्लोषात साजरा रत्नागिरी जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिव संघटनेला आज दिनांक ०८/१२/२०२४ रोजी वर्षपूर्ती होत असून त्यानिमित्ताने प्रथम वर्धापन दिन गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे दिमाखात पार पडला.
गेली अनेक वर्ष सचिव संघटना तयार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सचिव प्रयत्न करीत होते .परंतु या संघटनेची मुहूर्त मेढ रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिवांच्या प्रयत्नाने व संघटनेचे अध्यक्ष श्री विठोबा भोसले ,उपाध्यक्ष श्री.सुनील लोगडे,श्री प्रवीण राऊत व पदाधिकारी श्री. अनंत ठीक,श्री दिवाकर पाटील,श्री प्रभाकर मयेकर, श्री प्रदीप कामतेकर,श्री मधुकर जाधव,सौ.कावेरी साळवी,सौ.प्रियांका भाटकर,श्री.मनोज बाणे,श्री प्रदीप लिंगायत यांच्या प्रयत्नाने संघटना स्थापन करण्यात आली.
संघटना स्थापन करण्याकरिता श्री.मधुकर (आबा)टीळेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संघटनेच्या पहिला वर्धापन दिनास प्रमुख अतिथी श्री.गजानन (आबा) पाटील,श्री रामभाऊ गराटे.(रत्नागिरी जि.म.सह.बँक संचालक) ,रत्नागिरी जिल्हा संघ व्यवस्थापक श्री.रोहन कांबळे ,रत्नागिरी जि.म.सह.बँकेचे सरव्यवस्थापक श्री. नरेंद्र जाधव व श्री. विठ्ठल गंगावणे,संघटनेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सचिव व पदाधिकारी तसेच जिल्हातील सचिव सभासद उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री संदीप घवाळी यांनी केले.