मनसेचे अमृत तांबडे, संदीप पळसमकर यांचा प्रशासनाला इशारा
तहसीलदार, राजापूर पोलीस निरीक्षकांना निवेदन
राजापूर : बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार वाढत चालले आहेत. मात्र भारतात रोहींग्या, बांगलादेशी राहत आहे. त्यांना आपण राहू दिले आहे. मात्र बांग्लादेशात जर हिंदुंवर अत्याचार होत असतील तर बांगलादेशीना ही हाकलून द्यावे अन्यथा मनसे स्टाईल दाखवावी लागेल असा इशारा मनसेचे अमृत तांबडे, संदीप पळसमकर यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राजापूर तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे, राजापूर तालुक्यामध्ये अनधिकृत राहणारे रोहिंग्या बांग्लादेशी मुस्लीम आम्हां महाराष्ट्र सैनिकांना जर सापडले तर त्यांचा मनसे स्टाईलने स्वागत करू, त्यांच्यावर योग्य ती कारवाई कारवाई. तसेच ज्यांनी रोहिग्या बांग्लादेशी मुस्लीम घुसखोर जिहादी यांना सहारा दिला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून चौकशी करावी असे त्यांनी म्हटले आहे.