खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना एका 5 महिन्याच्या 20 वर्षीय गर्भवती महिला आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
या 20 वर्षीय विवाहितेचे 6 जून 23 रोजी लग्न झाले होते. ती 5 महिन्यांची गरोदर होती. तिचे वडील कामानिमित्त बाहेर गेलेले असताना विवाहिता बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अधिक उपारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कलंबनी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासले असता मृत घोषित केले. या बाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.