रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात निजामपूर परिसरातील रवाळजे साजे गावाचे हद्दीमध्ये कुंडलिका नदीवरती आंघोळ करण्यासाठी गेलेला एक तरुण आणि तीन तरुणी नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची दुर्घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. यातील तिघांचे मृतदेह शोध पथकाला सापडले, एक मृतदेहाचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे माणगाव तालुक्यात शोक काळा पसरली आहे. एकाला वाचविण्याच्या नादात तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुडणारा आणि वाचायला जाणारे तिघेजण अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की माणगाव तालुक्यातील शिरवली या गावी धोंडू सखाराम तेलंगे यांच्याकडे चौघेजण आले होते, हे सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. गावाजवळ असलेल्या कुंडलिका नदीवर आंघोळ करण्यासाठी सर्वजण गेले असता सिद्धेश राजेंद्र सोनार (२१), हा नदीमध्ये पोहत असताना त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज लागला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागतात त्याच्यासोबत आलेले सिद्धी गोपीचंद पेडेकर (१६), राजेंद्र सोनार (२१), आणि सोनी धरम सिंग सोनार (२१) सर्व राहणार सायन मुंबई सिद्धेशला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असताना हे तिघे देखील पाण्यात बुडाले आणि वरण पावले. वरीलपैकी तिघांच्या मृतदेहाचा तपास लागला असून सोनी धरमसिंग सोनार हिचा तपास सुरू आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.