दापोली : शहरातील माछीमार्केट येथे चोरीच्या उद्देशाने बसलेल्या शाकिब नासिर मुल्ला या 24 वर्षीय तरुणाला दापोली पोलिसांनी अटक केल्याची घटना शुक्रवार रात्री 1 वाजता घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीब मुल्ला (रा.पांनदी दाभिळ) हा शुक्रवार 6 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजता माछीमार्केट दापोली येथे दापोली चिकन सेंटर दुकानाच्या आडोशाला अंधारात लपून बसलेला आढळला.
हा तरुण चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या बसलेला दिसला. त्याच्या हातामध्ये स्टीलचा रॉडही आढळला. दापोली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (अ) प्रमाणे त्याला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.