रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी ते परचुरी असा चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा उक्षी रेल्वेस्टेशनजवळील उतारात ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. अपघातामध्ये ट्रकमधील पाचजण जखमी झाले. त्यातील एकाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सिधू मोतीराम चव्हाण (32, रा. चवे, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ट्रक चालक अनंत राठोड हे ट्रक (एमएच-10 एडब्ल्यू 2757) घेऊन जाकादेवी ते परचुरी (ता. संगमेश्वर) असे जाताना उक्षी रेल्वस्टेशन रस्त्यावरील उतारातील वळणावर ट्रक आला असताना ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि अपघात झाला. या अपघातील मृत सिधू चव्हाणसह चारजण खाली पडले. त्यामध्ये सिधूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर इतर चारजण जखमी झाले. सिंधूला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.